ST Mahamandal Portal

Ratnagiri Bus Stand Time Table - एसटी बस वेळापत्रक


राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी एसटी बस स्थानक वेळापत्रकाची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यामध्ये रत्नागिरी बस आगारातून सुटणाऱ्या बसेच चे नाव, बस चा मार्ग, बस सुटण्याची वेळ, तिकीट दर, बस चा प्रकार, बस स्थानकावरील सोयी सुविधा यांचा समावेश केलेला आहे.


ratnagiri st depo photo.jpg


Ratnagiri Bus Depot Time Table - रत्नागिरी बस स्थानक वेळापत्रक


सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


बस चे शेवट चे ठिकाण वेळापत्रक जाणाऱ्या एकूण बसेस
मुंबई 09:30 14:45 (खेड) 21:00 06:30 (जादा) 20:30 (जादा) - 5
बोरिवली 05:30 10:15 (चिपळूण आगार) 18:30 (राजापूर आगार) 19:30 [दे. गोठणे] 07:30 (जादा) 20:00 (जादा) 6
ठाणे मार्गे 07:00 (भिवंडी) 07:30 (वसई) 08:00 (विठ्ठलवाडी) 09:00 (नालासोपारा) 19:00 (राजापूर नालासोपारा) - 5
पुणे 06:00 (चिपळूण मार्गे) 07:45 (कोकरुड मार्गे) 11:00 (कोल्हापूर) 11:15 (चिपळूण मार्गे) 19:45 (कोकरुड मार्गे) 20:00 (चिपळूण मार्गे), 21:00 (कोकरुड मार्गे) 7
सातारा 14:15 - - - - - 1
मंडणगड 16:15 - - - - - 1
दापोली 07:15 08:30 12:30 15:00 (केळशी) 17:00 - 5
खेड 06:45 13:00 15:30 15:45 - - 4
गुहागर 07:50 (चिपळूण मार्गे) 11:00 (आबलोली मार्गे) 13:30 (आबलोली मार्गे) 14:30 (गणेशखिंड मार्गे) 14:45 (नरवण मार्गे) 16:30 (आबलोली मार्गे), 16:15 (चिपळूण मार्गे) 7
चिपळूण 06:15 08:15 10:00 10:30 11:00 12:00, 13:30, 14:00, 16:00, 16:30, 17:30, 17:45, 18:00, 18:15 14
संगमेश्वर 07:40 - - - - - 1
देवरुख पांगरी मार्गे: 06:15, 07:00, 07:30, 08:00, 08:30, 09:00, 09:30, 09:45, 10:00, 10:30, 11:00, 11:30, 12:00, 12:30, 13:00, 13:30, 14:00, 14:30, 15:00, 15:30, 16:00, 16:15, 16:30, 17:00, 17:15, 17:30, 18:15, 19:30, 20:00
तळेकांटे मार्गे: 08:15, 13:00, 18:30
32
आरेवारे ग. पुळे 05:30 07:15 09:15 (कोल्हापूर) 09:30 11:15 (देवगड कुणकेश्वर) 12:30, 13:00, 14:45, 16:15, 18:15 10
निवळी मार्गे ग. पुळे 07:30 (वरवडे) 08:15 (निवेंडी) 11:30 12:45 13:00 (गडनरळ) 13:15 (निवेंडी), 19:15 (चिप.ग. पुळे) 7
जयगड 05:45 08:00 09:00 09:45 11:00 12:30 6
सैतवडे 14:00 15:30 17:30 18:30 07:00 12:00, 13:30, 16:45 8
जांभारी 17:00 - - - - - 1
खंडाळा 13:00 - - - - - 1
लांजूळ 05:45 - - - - - 1
फुणगुस 06:15 - - - - - 1
काजरेकोंड 09:00 13:15 15:00 18:30 - - 4
मालपवाडी 07:45 - - - - - 1
पाली 09:00 17:15 12:00 (देवळे मेघी) 18:00 (देवळे मेघी) - - 4
रिंगीची वाडी 07:00 09:15 11:00 13:15 16:15 18:30, 19:30 7
ओझरवाडी 07:45 09:30 16:10 - - - 3
वाकीवाडी 09:00 16:30 - - - - 2
पानवल 06:00 07:30 09:00 10:30 14:00 16:30, 18:00 7
काजरघाटी मार्गे 07:15 (कुरतडे तोणदे), 07:45 (नवेठ ओशी), 08:30 (भाटकर कोंड), 09:00 (मांडवकर वाडी), 09:15 (कुरतडे चांभार), 09:30 (सोमेश्वर मां. वाडी), 12:30 (कुरतडे तोणदे), 13:45 (नवेठ ओशी), 14:15 (कुरतडे तोणदे), 15:30 (सोमेश्वर तोणदे चांभार), 15:45 (भाटकर कोंड), 16:00 (चांदेराई कुरतडे मां. वाडी), 18:15 (सोमेश्वर तोणदे), 18:30 (सोमेश्वर कुरतडे चांभार), 19:00 (हरचेरी मां. वाडी), 11:30 (बागपाटोळे), 16:45 (हरचेरी मां. वाडी) 17
पावस मार्गे 04:45 (बोरी. दे. गोठणे), 05:45 (बेनी माळ), 06:30 (नाटे), 07:00 (कुणकेश्वर), 07:10 (स्वामी नाखरे), 07:20 (बेनी हर्षे), 07:30 (आंबोळगड), 07:45 (हर्षे), 08:00 (पूर्णगड), 08:15 (नाटे), 08:30 (गुरववाडी), 09:00 (दाभीळ आंबरे), 09:10 (नाटे), 09:15 (गावखडी मोहल्ला), 09:30 (स्वामी नाखरे), 10:30 (दाभीळ आंबरे), 10:45 (आंबोळगड), 11:05 (गावखडी पुल), 11:30 (हर्षे), 11:30 (खांबड नाखरे), 11:40 (निरुळ चांभार), 11:45 (गुरववाडी), 12:00 (नाटे), 12:30 (भडे), 12:45 (आंबोळगड), 13:00 (वाघट), 13:15 (हर्षे), 13:30 (पावस), 13:30 (देवाचे गोठणे), 14:30 (नाटे), 15:00 (भडे), 15:30 (दाभीळ आंबरे), 15:45 (आंबोळगड), 16:15 (बेनी माळ), 16:20 (स्वामी नाखरे), 16:20 (गावखडी मोहल्ला), 16:30 (आंबोळगड), 17:30 (भडे खानवली), 17:45 (खांबड नाखरे), 18:10 (खांबड नाखरे), 18:20 (आगवे कोट), 18:30 (बेनी माळ), 18:45 (गावखडी पुल), 19:00 (गणेशगुळे), 19:15 (स्वामी नाखरे), 19:30 (गुरववाडी), 20:00 (पूर्णगड), 20:30 (गावखडी मोहल्ला) 48
कोतवडे मार्गे 05:45 (धामणसे जाकादेवी), 07:00 (जांभरुण), 08:00 (खरवते), 08:15 (धामणसे जाकादेवी), 08:45 (जांभरुण), 10:15 (ग. पुळे वरवडे), 11:30 (ग. पुळे जांभारी), 12:00 (खरवते), 13:00 (जांभरुण), 13:30 (खंडाळा मिरवणे), 14:00 (धामणसे जाकादेवी), 14:45 (चवे देऊड), 15:20 (ग. पुळे वरवडे), 15:45 (जांभरुण), 17:30 (खरवते), 18:00 (ग. पुळे वरवडे), 18:30 (जांभरुण), 19:00 (धामणसे), 19:30 (दापोली ग. पुळे) 19
लांजा 05:20 (पाली मार्गे), 05:45 (का. घाटी मार्गे), 07:30 (का. घाटी मार्गे), 08:15 (पाली मार्गे), 09:45 (साटवली मार्गे), 10:15 (का. घाटी मार्गे), 10:15 (पाली मार्गे), 10:30 (पाली मार्गे), 10:45 (का. घाटी मार्गे), 11:00 (पाली मार्गे), 11:15 (पाली मार्गे), 11:30 (पावस मार्गे), 13:00 (का. घाटी मार्गे), 13:30 (पाली मार्गे), 14:15 (पावस मार्गे), 14:30 (पाली मार्गे), 15:45 (पाली मार्गे), 16:30 (का. घाटी मार्गे), 16:30 (पाली मार्गे), 17:30 (का. घाटी मार्गे), 18:30 (पाली मार्गे), 19:15 (पाली मार्गे), 20:45 (पाली मार्गे) 23
खोरनिनको 16:15 (देवळे कोळें तिठा मार्गे) 1
राजापूर 05:30 (पावस मार्गे), 05:45 (पावस मार्गे), 06:00 (पावस मार्गे), 06:30 (पावस मार्गे), 07:40 (लांजा मार्गे), 07:50 (लांजा मार्गे), 08:45 (लांजा मार्गे), 09:30 (लांजा मार्गे), 10:00 (लांजा मार्गे), 10:30 (लांजा मार्गे), 11:00 (लांजा मार्गे), 11:30 (लांजा मार्गे), 12:00 (लांजा मार्गे), 13:00 (लांजा मार्गे), 13:20 (लांजा मार्गे), 13:45 (लांजा मार्गे), 14:45 (पावस मार्गे), 16:30 (कोतापूर), 17:30 (लांजा मार्गे), 18:15 (लांजा मार्गे), 18:40 (लांजा मार्गे) 21
सिंधुदुर्ग (लांजा मार्गे) 05:30 (पणजी), 06:00 (सावंतवाडी), 07:00 (सावंतवाडी), 08:00 (मालवण), 10:30 (कणकवली), 12:30 (देवगड), 14:00 (वेंगुर्ले), 15:00 (देवगड), 15:30 (कुडाळ), 16:00 (मालवण), 17:00 (सावंतवाडी) 11
सिंधुदुर्ग (पावस मार्गे) 07:00 (देवगड कुणकेश्वर), 09:45 (विजयदुर्ग), 11:15 (देवगड), 13:15 (विजयदुर्ग), 14:00 (मालवण), 15:00 (देवगड कुणकेश्वर), 16:00 (विजयदुर्ग) 7
मलकापूर (कोल्हापूर मार्गे) 04:45 (लातूर), 05:30 (जत), 06:00 (अक्कलकोट), 06:30 (कोल्हापूर), 06:45 (भूम), 07:00 (बेळगांव), 07:15 (मिरज), 07:30 (आंबेजोगाई), 08:00 (विजापूर), 08:15 (तुळजापूर), 08:45 (हुबळी), 09:30 (कोल्हापूर), 10:00 (कोल्हापूर), 10:30 (कोल्हापूर), 11:00 (स्वारगेट), 12:00 (कोल्हापूर), 13:00 (कोल्हापूर), 13:15 (मिरज), 13:30 (इचलकरंजी), 14:00 (नृसिंहवाडी), 14:30 (गारगोटी), 15:15 (इचलकरंजी), 15:30 (कोल्हापूर), 16:00 (कोल्हापूर), 16:30 (कोल्हापूर), 17:00 (अक्कलकोट), 17:30 (कोल्हापूर), 18:30 (विजापूर) 28
स्थानिक मार्ग
वेळवंड 08:30, 11:45 (पाली मार्गे), 13:00, 16:45, 18:30 5
झरेवाडी 06:45, 09:15, 18:15 3
भोके 05:45, 09:15, 10:15, 12:30, 16:30, 18:30 6
बेतोशी 07:30, 11:30, 13:00, 18:30 4
कापडगांव 06:30, 10:30 2

लक्षात ठेवा: बस च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवासापूर्वी MSRTC पोर्टल किंवा स्थानिक एस टी डेपोमध्ये चौकशी करा.


Ratnagiri Bus Stand Time Table PDF



ratnagiri st depot photo

ratnagiri bus depot photo

ratnagiri bus stand photo

बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

रत्नागिरी बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर

रत्नागिरी एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

रत्नागिरी बस स्थानक: फलाट क्रमांक आणि मार्ग

फलाट क्रमांक जाणाऱ्या बसेस / मार्ग
1 मुंबई, बोरिवली, परळ, ठाणे, कुर्ला (लांब पल्ल्याच्या गाड्या)
2 पुणे (स्वारगेट, चिंचवड), कोल्हापूर (मार्गे आंबा घाट)
3 सांगली, सोलापूर, सातारा, मिरज
4 गणपतीपुळे, मालगुंड, जयगड (स्थानिक पर्यटन मार्ग)
5 राजापूर, नाटे, जैतापूर, पाचल
6 चिपळूण, दापोली, गुहागर, खेड
7 पावस, पूर्णगड, गावखडी (दक्षिण रत्नागिरी ग्रामीण)
8 लांजा, साखरपा, देवरुख
9 पणजी, सावंतवाडी, कुडाळ, मालवण (सिंधुदुर्ग मार्ग)
10 शहर वाहतूक आणि राखीव

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

प्रश्न: रत्नागिरी एसटी बस आगार संपर्क क्रमांक काय आहे?
उत्तर: रत्नागिरी बस आगाराचा संपर्क क्रमांक 02352-222381 आणि 02352-222302 हा आहे. गाड्यांच्या चौकशीसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता.


प्रश्न: रत्नागिरीतून मुंबई/पुण्यासाठी बसेस किती वाजता आहेत?
उत्तर: रत्नागिरी ते मुंबईसाठी (बोरीवली, परळ, ठाणे) सकाळपासून रात्रीपर्यंत ठराविक अंतराने बसेस उपलब्ध आहेत.
रत्नागिरी ते पुणे प्रवासासाठी पहाटे 5 वाजल्या पासून बसेस आहेत. स्वारगेट आणि चिंचवडसाठी नियमित फेऱ्या आहेत.


प्रश्न: रत्नागिरी वरून कोल्हापूर साठी बसेस आहेत का?
उत्तर: रत्नागिरी ते कोल्हापूर साठी दर 1 तासांनी बस उपलब्ध आहेत.


प्रश्न: रत्नागिरी बस स्थानकावर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
उत्तर: रत्नागिरी बस स्थानकावर पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छतागृह, बस वेळापत्रक, प्रतीक्षा कक्ष, उपहारगृह अशा आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.




© 2026 All Rights Reserved