एस टी महामंडळ पोर्टल

ST Bus Booking Online

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश नागरिक राज्यातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एस टी ने प्रवास करतात परंतु त्यांना एस टी ची तिकीट ऑनलाईन बुकिंग कशी करायची हे माहित नसते. त्यामुळे आज आपण एस टी ची ई तिकीट ऑनलाईन बुकिंग कशी करतात ते पाहणार आहोत.

तुम्हाला एस टी ची ऑनलाईन तिकीट बुकिंग करायची असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला पोर्टल वर स्वतःची नोंदणी {Regisration} करावी लागेल.


टप्पा: पहिला
  • आपणास सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) च्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर गेल्यावर तुम्हाला सर्वात प्रथम उजव्या बाजूला वरती Login बटनावर क्लिक करायचे आहे.
  • msrtc login button
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Register या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • msrtc register button
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली माहिती भरावयाची आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर Register या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • msrtc registration form
  • अशा प्रकारे तुमची Registration प्रक्रिया पूर्ण होईल.

लक्षात ठेवा: जर तुमची आधीच नोंदणी झाली असेल तर तुम्हाला Login बटनावर क्लिक करून तुमचा Username आणि Password टाकून Login बटनावर क्लिक करायचे आहे.


टप्पा: दुसरा:
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर किंवा Login केल्यावर तुमच्यासमोर तिकीट बुकिंग चे पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Leaving From या जागी तुम्हाला तुमचे बसण्याचे ठिकाण टाकायचे आहे. आणि Going To मध्ये तुम्ही कुठे उतरणार हे टाकायचे आहे. आणि तुम्हाला तुमच्या प्रवासाची तारीख टाकायची आहे. आणि Search बटनावर क्लिक करायचे आहे.
  • traveling details
  • आता तुम्हाला तुम्हाला उपलब्ध बसेस दिसतील. त्यामधून तुम्हाला बस च्या वेळेनुसार तसेच तुमच्या सोयीनुसार निवड करावयाची आहे. त्यासाठी तुम्हाला Select Seats बटणावर क्लिक करायचे आहे.
  • select seats
  • आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला View Seats या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • view seats
  • View Seats वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर बस मध्ये जे सीट्स उपलब्ध आहेत तसेच ज्या सीट्स ची बुकिंग झाली आहे ते दिसेल. उपलब्ध सीट्स मधून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार निवड करायची आहे. त्यासाठी तुम्हाला उपलब्ध सीट्स वर क्लिक करायचे आहे. तसेच तुम्हाला category ची निवड करायची आहे (उदा. General,Mahila Sanman Yojana,Amrut Sr. Citizen,Sr. Citizen,Handicapped/Mentally Retarde,Handicapped/Mentally Retarde person escort,blind,blind escort) आणि Passenger ची विचारलेली सर्व माहिती भरावयाची आहे.
  • general information
    select category
  • सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला Pay & Book या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमच्या तिकीट ची Amount दिसेल त्यामध्ये तुम्हाला Paytm वर क्लिक करायचे आहे.
  • paytm
  • आता तुमच्या समोर Payment Method दिसतील त्यामधून तुमच्या सोयीनुसार जी Payment Method असेल त्याची निवड करायची आहे. आणि Proceed Securely या बटणावर क्लिक करायचे आहे. आणि तिकीट ची Amount Paid करायची आहे.
  • paymet method
  • Online Amount Paid केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामधून तिकीट चे पैसे वजा (Amount Debit) होतील.
  • Amount Debit झाल्यावर तुमच्या समोर तुम्ही बुक केलेली तिकीट दिसेल. त्या तिकीट ची तुम्हाला प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवायची आहे.
  • तुम्ही तुमच्या तिकीट ला Save करून नंतर देखील प्रिंट काढू शकता.
  • तसेच तुमची तिकीट तुमच्या Account मध्ये Save होते. त्यामुळे तुम्ही कधी पण तुमचा Username आणि Password टाकून नंतर प्रिंट काढू शकता.
  • तुम्ही प्रवास कराल तेव्हा मोबाईल मधील तिकीट ची PDF देखील वाहकाला दाखवू शकता.
  • अशा प्रकारे तुमची ऑनलाईन तिकीट बुकिंग प्रक्रिया पूर्ण होईल.

ई तिकीट ऑनलाईन बुकिंग येथे क्लिक करा


© 2025 All Rights Reserved