प्रश्न: रा.प. महामंडळाच्या बसेसचे तिकीट आगाऊ आरक्षित केल्यास काय फायदे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हा महाराष्ट्रातील एकमेव सरकारी राज्य परिवहन
उपक्रम आहे. रा.प. महामंडळाच्या बसेसचे तिकीट आगाऊ आरक्षित केल्यास खालील फायदे आहेत. - तुम्हाला
तुमच्या पसंतीची जागा निवडता येते. - तुम्हाला तुमची बस तिकीटे इंटरनेटद्वारे रा.प. महामंडळाच्या अधिकृत
खाजगी एजंट, मोबाईल तसेच नजीकच्या रा.प. बसस्थानकावर आरक्षित करु शकता. - बसमधे चढण्याचे ठिकाण, वेळ
तसेच बसप्रकारावर आधारित बसेखे तिकीट आरक्षित करता येते. - बस मार्गस्थ बिघाड झाल्यास बदली बस दिली
जाते. - मर्यादित वेग तसेच कुशल चालकांद्वारे सुरक्षित प्रवास.
प्रश्न: मी माझी बस ट्रॅक करु शकतो का? आणि बस सध्या कुठे आहे हे लाईव्ह पाहु शकता का ?
उत्तर: हो, आपण msrtc Computer app या अॅप मधील track my bus पर्यायाद्वारे बस क्रमांक व आरक्षण
तिकीटावरील Bus Service Number प्रविष्ट करुन बसचे मार्गावरील स्थान पाहू शकता.
प्रश्न: ऑनलाईन तिकीट बुकींग करण्यासाठी जास्त खर्च येतो का?
उत्तर: नाही तिकीट ऑनलाईन बुकींग करण्यासाठी कोणतेही अतिरीक्त शुल्क समाविष्ट नाही. तुम्ही
काऊंटरवरुन आरक्षण तिकीट खरेदी करता तितकाच खर्च तिकीट ऑनलाईन बुकींग करण्यासाठी येईल.
प्रश्न: तिकीट आरक्षित करताना तिकीटाची रक्कम बँक खात्यातुन डेबिट झाली परंतु तिकीट आरक्षित झाले
नाही (व्यवहार अयशस्वी) याकरीता मी काय करावे?
उत्तर: कृपया supportmsrtc@ebixcash.com या ईमेलवर ईमेल करावा ज्यामध्ये महामंडळाचा नोंदणीकृत
ई-तिकीट संदर्भ क्रमांक किंवा वापरकर्ता आयडी आणि व्यवहाराची तारीख नमुद करावी. पेमेंट करा या बटणावर
क्लिक केल्यावर संदर्भ क्रमांक आपोआप प्राप्त होईल. वापरकर्त्याने प्रदर्शित होणारा संदर्भ क्रमांक
लक्षात ठेवावा. यशस्वी व्यवहाराच्या बाबतीत ई-तिकीट बुकींगमध्ये लॉगिन करताना व्हयु ई-तिकीट बुकींग
इतिहास (History) वर संदर्भ क्रमांक मिळ शकतो.
प्रश्न: मोबाईल ॲप वरुन तिकीट बुकींग करण्यासाठी मला जास्त खर्च येतो का?
उत्तर: मोबाईल ॲप वरुन तिकीट बुकींग करिता कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. ही एक मोफत
सेवा आहे.
प्रश्न: माझे तिकीट हरवले आहे, आता मी काय करु ?
उत्तर: जर ते ई-तिकीट/एम- तिकीट असेल तर तुम्ही ते होम पेजवरील प्रिंट/एसएमएस तिकीट लिंक द्वारे
मिळवु शकता आणि प्रवासाच्या वेळी ते वाहकास दाखऊ शकता. जर तिकीट रा.प महामंडळाच्या बसस्थानकावरील आरक्षण
केंद्रांवरुन किंवा खाजगी एजंट यांचेकडून खरेदी केले असेल तर प्रवाशांना नवीन तिकीट खरेदी करावे लागेल.
प्रश्न: मी माझ्या नावाने ई-तिकीट बुकींग केले आहे त्या तिकीटावर दुसरा कोणी प्रवास करु शकतो
का?
उत्तर: नाही. रा.प महामंडळाचे तिकीट हस्तांतरणीय नाही
प्रश्न: प्रवासभाड्यात सवलत धोरण
उत्तर: "१. सदर योजना माहे जुलै २०२५ पासून (दिवाळी गर्दीचा हंगाम व उन्हाळी गर्दीचा हंगाम
वगळून) प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. २. सदर योजनेअंतर्गत फक्त पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना
(कोणतीही सवलत नसलेले प्रवासी) प्रवासाच्या मुळ तिकीट रकमेवरच (अपघात सहाय्यता निधी, वस्तु व सेवाकर
रक्कम वगळून ) प्रवासभाडयात १५% सुट अनुज्ञेय आहे. ३. सदरची सुट ही दि.३०.०६.२०२५ व दि.०१.०७.२०२५ च्या
मध्यरात्री पासून आगाऊ आरक्षण (संगणकीय, मोबाईल अॅपद्वारे , स्थानकावरील आरक्षण केंद्र, अधिकृत खाजगी
आरक्षण केंद्र, रा.प. महामंडळाचे संकेतस्थळ द्वारे केले जाणारे आरक्षण) करणा-या प्रवाशांना लागू राहील.
४. ज्या प्रवाशांनी दि.०१.०७.२०२५ पुर्वी आगाऊ आरक्षण केले असेल व ज्यांचा प्रवास दि.०१.०७.०२५ रोजी
किंवा या तारखेनंतर सुरु होणार असेल अशा प्रवाशांना सदर १५% सूट लागू राहणार नाही. ५. आषाढी पंढरपूर
यात्रा जादा वाहतुक, गौरी गणपती जादा वाहतूक व अशा प्रकारच्या अन्य यात्रांमध्ये केल्या जाणा-या ग्रुप
बुकींग आरक्षणासाठी सदर सूट लागू राहणार नाही. सदर सूट फक्त ज्या फे-या संगणकीय आरक्षणास उपलब्ध करुन
देण्यात आलेल्या आहेत अशाच फे-यांना सदरची सवलत लागू राहील. ६. सदर सुट सर्व सेवा प्रकारातील बसेसना
लागु राहील."
प्रश्न: रा.प महामंडळाच्या बस प्रवासाचे तिकीट कसे बुक करावे?
उत्तर: "ज्या प्रवाशाला तिकीट बुक करायचे असेल त्यांने रा.प महामंडळाच्या बसस्थानकावरील आरक्षण
केंद्र किंवा कोणत्याही अधिकृत तिकीट बुकींग एजंटद्वारे किंवा ऑनलाईन बुकींग साई› www.msrtc.gov.in ला
या संकेतस्थळाला भेट द्यावी. रा.प महामंडळाचे तिकीट आरक्षित करणे, किंवा आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठी
एक छापिल मागणी अर्ज बसस्थनकावर उपलब्ध आहे आहे. प्रवाशाला सदर अर्ज भरुन बसस्थानकावरील आरक्षण
केंद्रांवरील कर्मचारी / अधिकृत खाजगी एजंट यांचेकडे सदर अर्ज सादर करावे लागतील."
प्रश्न: परतीच्या प्रवासाचे तिकीट (RJT) म्हणजे काय ?
उत्तर: परतीच्या प्रवासाचे तिकीट हे परतीच्या प्रवासाचे तिकीट आगाऊ आरक्षित करते. परतीच्या
प्रवासाच्या तिकीटाद्वारे आसन आरक्षित करता येते.
प्रश्न: हि तिकीटे एजंटकडे उपलब्ध आहेत का ?
उत्तर: सर्व संगणकीकृत अधिकृत खाजगी एजंट द्वारे देखील परतीच्या प्रवासाचे तिकीट खरेदी करता
येते.
प्रश्न: अधिकृत तिकीट बुकींग (ATB) एजंट कोण आहेत?
उत्तर: विविध लांब, मध्यम लांब पल्याच्या सेवांसाठी रा.प महामंडळाच्या विभागीय स्तरावरुन आगाऊ
आरक्षण तिकीटे आरक्षित करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजे खाजगी एजंट होय.
प्रश्न: तिकीट कसे रद्द करावे ?
उत्तर: "१. तिकीटे रद्द करण्यासाठी, रद्द करण्याचे शुल्क खालील नमुद केलेल्या वेळेनुसार लागु
असलेल्या प्रवासभाड्यावर आकारले जाते २. सवलतींसह तिकीटे रद्द करणे हे लागु असलेल्या नियमांनुसार असेल
तथापि तिकीटाच्या वसुल केलेलया भाड्यावर रद्द शुल्क निश्चित केले जाईल, शिवाय रद्द शुल्क फक्त
प्रवासभाड्यावर लागु आहे ३. आरक्षण शुल्क आणि सेवा शुल्क परत करण्यात येत नाहीत. ४. ई-तिकीटे रद्द करणे
आणि परतावा (आरक्षण शुल्क वगळून) खालीलप्रमाणे आहेत तिकीट रद्द करण्याच्या अटी अ.क्र. कालावधी तिकीट रद्
शुल्क १. सुरुवातीच्या ठिकाणाहून बस सेवा सुरू होण्याच्या वेळेच्या २४ तासांपेक्षा जास्त कालावधीकरिता
१०% २. बस सुरु होण्याच्या वेळेच्या २४ तास आधी आणि १२ तासांपर्यंत २५% ३. बस सुरू होण्याच्या वेळे
पासून १२ तासापासुन ते एक तास आधीपर्यंत ५०% ४.बस सुरू होण्याच्या वेळेपासून एक तास आधीपर्यंत परतावा
नाही ५. बस सुटण्याच्या वेळेनंतर परतावा नाही १. जर कोणत्याही कारणास्तव रा.प महामंडळाद्वारे बस सेवा
रद्द केली असेल तर प्रवाशांना प्रवासाच्या तारखेपासुन १५ दिवसांच्या आत तिकीट रद्द करुन सेवा शुल्क
वगळता संपुर्ण परतावा मिळु शकतो. २. प्रवासाच्या तारखेपासुन १५ दिवसानंतर रद्द करण्याची परवानगी नाही."
प्रश्न: या बस स्थानकांवर कोणत्या महत्त्वाच्या सुविधा पुरविल्या जातात?
उत्तर: "१.रा.प. बसचे वेळापत्रक २. पिण्याचे पाणी ३. स्वच्छतागृह ४. बैठक व्यवस्था ५. चौकशी कक्ष
६. दुचाकी वाहन तळ ७. तक्रार व सुचना पुस्तिका ८. चहा/शीतपेय दुकाने ९. पुस्तक दुकान १०. अत्याधुनिक
तिकीअ आरक्षण सुविधा ११. वजन काटा १२. सीसीटीव्ही १३. व्हील चेअर"
प्रश्न: अधिकृत खाजगी तिकीट बुकींग एजंटद्वारे कोणत्या सुविधा पुरविल्या जातात?
उत्तर: अधिकृत खाजगी तिकीट बुकींग एजंटद्वारे विविध लांब पल्याच्या सेवांच्या तिकीटांचे आगाऊ
बुकींग करता येते. महत्वाच्या शहरांमध्ये विविध ठिकाणी अधिकृत खाजगी एजंट नियुक्त केले आहेत. या अधिकृत
खाजगी बुकींग एजंटची माहिती संबंधित विभाग नियंत्रक/आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधुन मिळु शकते.
प्रश्न: ऑनलाईन (ई-तिकीट) बुक करण्यासाठी मला नोंदणी करावी लागेल का?
उत्तर: ऑनलाईन तिकीट काढण्याकरिता प्रवाशास नोंदणीसह आणि नोंदणीशिवाय (अतिथी वापरकर्ता) तिकीट
आरक्षित करण्याचे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत
प्रश्न: ई-मेल आयडी आवश्यक आहे का?
उत्तर: होय, वैध ई-मेल आयडीशिवाय नोंदणी प्रकीया यशस्वी होऊ शकत नाही
प्रश्न: ओळख पत्र किंवा ई-तिकीट बाळगणे अनिवार्य आहे का?
उत्तर: होय. प्रवासाच्या वेळेस फोटो असलेले ओळखपत्र म्हणजेच वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड,
मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधारकार्ड, रेशनकार्ड, जेष्ठ नागरिक ओळखपत्र (शासन/रा.प महामंडळाने दिलेले),
सरकारी विभागांनी दिलेले ओळखपत्र (फोटोसह) खाजगी कंपनीचे मुळ ओळखपत्र (फोटोसह) खाजगी शैक्षणिक संस्थेचे
मुळ ओळखपत्र (फोटोसह), क्रेडीट कार्ड अथवा डेबीट कार्ड (फोटोसह) सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रवासा दरम्यान
सदर कागदपत्रे वाहकास सादर करणे आवश्यक आहे.
प्रश्न: ई-तिकीटाची प्रत घेणे अनिवार्य आहे का?
उत्तर: ई-तिकिटाची प्रत घेणे बंधनकारक नाही. ई-तिकीट/एम तिकीटासाठी तुमच्या मोबाईलवर एसएमएस
पाठविला जातो. प्रवासावेळीस सदर एसएमएस वाहकास दाखवावा.
प्रश्न: "ई-तिकीट कसे प्राप्त करावे? "
उत्तर: तुम्ही तुमचे तिकीट ऑनलाईन जनरेट करु शकता. होम पेजच्या "पीएनआर चौकशी" वर जा पीएनआर
नंबर, मोबाईल नंबर द्या आणि प्रवासासाठी ई-तिकीट मिळवण्यासाठी सेंट प्रिंट ई-मेल वर क्लिक करा. ई-तिकीट
आणि एम-तिकीट बुक केल्यावर तिकीटाची प्रत तुम्हाला ई- मेलद्वारे पाठविली जाते. कृपया त्या मेलच्या
प्रिंट घ्या आणि त्या प्रवासाच्या वेळी सादर करा.
प्रश्न: सहा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत प्रवास करण्याची परवानगी आहे. ब. सहा वर्षापेक्षा
जास्त वयाच्या आणि बारा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी अर्धे भाडे आकारले जाईल. क. बारा वर्षावरील
मुलांकरिता पुर्ण भाडे आकारले जाईल.
उत्तर: चिमूर बस स्थानकातून लालपरी, शिवशाही, शिवाई, विठाई, बसेस सुटतात.
प्रश्न: "ऑनलाईन तिकीट बुक करताना मला काही अडचणी आल्यास मी काय करावे? "
उत्तर: "ऑनलाईन तिकीट बुकींगशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी/ सहाय्यासाठी तुम्ही टोल फ्री नंबर
१८००१२५० (कॉल सेंटर) वर संपर्क साधु शकता. तसेच तुम्ही supportmsrtc@ebixcash.com
msrtchelpdesk@gmail.com वर मेल करु शकता."
प्रश्न: "बस चुकली असता मला तिकीटाचा परतावा मिळेल का? "
उत्तर: जर एखादी बससेवा रा.प महामंडळाद्वारे रद्द केली तर महामंडळ तिकीटाचा १००% परतावा देते
तथापि जर बस रा.प महामंडळाशी संबंधित नसलेल्या ईतर कोणत्याही कारणामुळे चुकली तर महामंडळ कोणताही परतावा
देत नाही
प्रश्न: मदत आणि चौकशीसाठी मी कुठे संपर्क साधावा? "
उत्तर: "तिकीट बुकींगशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी/सहाय्यासाठी तुम्ही १८००२२१२५० कॉलसेंटर
क्रमांकावर २४ तास संपर्क साधु शकता. तसेच तुम्ही supportmsrtc@ebixcash.com व msrtchelpdesk@gmail.com
वर मेल करु शकता."
प्रश्न: महामंडळाच्या बसेसद्वारे किती प्रवाशांची वाहतूक होते?
उत्तर: रा.प महामंडळाद्वारे सन २०२४-२०२५ मध्ये २१३.३३ कोटी हुन अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात
आली आहे.
प्रश्न: ज्या व्यक्तीने त्याच्या क्रेडीट/डेबीट कार्डने तिकीट आरक्षित केले आहे तो. प्रवासी
प्रवासात सहप्रवासी म्हणून असणे आवश्यक आहे का?
उत्तर: नाही. तथापि प्रवास करणा-या प्रवाशाने ओळखीचा कोणताही पुरावा व प्रवासाचे तिकीट बाळगणे
आवश्यक आहे.
प्रश्न: मी माझे तिकीट ऑनलाईन पद्धतीने रद्द करु शकतो का?
उत्तर: "नोंदणीकृत वापरकर्ता ऑनलाईन बुक केलेली तिकीटे ऑनलाईन रद्द करु शकतो. तिकीट रद्द
करण्याच्यावेळी परतावा धोरणानुसार परतावा शुल्क लागु असेल मात्र सेवा सुरू करण्याचे ठिकाण, प्रस्थानाची
वेळ आणि गंतव्य स्थान ई-तिकीटावर सुचित करणे आवश्यक आहे. "
प्रश्न: ई-तिकीट बुकींग केल्यानंतर मी प्रवासाची वेळ तारीख, नांव, लिंग, वय इ. बदलु शकता का
?
उत्तर: नाही. एकदा ई-तिकीट बुक केल्यानंतर कोणताही बदलत करता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला
ई-तिकीट रद्द करावे लागते आणि उचित नांव, लिंग, वय, वेळ इ नोंद करुन पुन्हा बुक करावे लागेल.
प्रश्न: रा.प महामंडळाने ने बससेवा रद्द केल्यास किंवा व्होल्वो एसी किंवा नॉन एसी इ. सेवात
प्रकारात बदल केल्यास मला भाडे परत कसे मिळेल ?
उत्तर: ई-तिकीटधारी प्रवाशांच्या बाबत बससेवेत बदल झाल्यास बससेवा रद्द झाल्यास, बससेवा खंडीत
झाल्यास परतावा फक्त संबंधित बँक खात्याद्वारे केली जाईल आणि प्रवाशाला रोख परतावा दिला जाणार नाही.
परताव्याच्या दाव्यासाठी संबंधित आगार व्यवस्थापकांकडे ई-तिकीट प्रिंट आऊट सादर करावी लागेल. आगार
व्यवस्थापक पेमेंट गेटवे बँकेसह परतफेड प्रक्रिया सुरू करतील आणि परतफेड आपोआप प्रवाशाच्या बँक खात्यात
आपोआप जाईल. रा.प आरक्षण केंद्राद्वारे आरक्षित केलेल्या तिकीटाचा परतावा आगार व्यवस्थापक यांचेद्वारे
रोखीने करण्यात येतो.
प्रश्न: जर बस वेळेवर धावत नसतील, जर बसचालक किंवा वाहक गैरवर्तन करत असेल तर/ तर तिकीटाचे भाडे
योग्य रित्या आकारले जात नसेल/ जर बसवाहक वृद्ध किंवा अपंग प्रवाशांना त्यांच्यासाठी राखीव असलेल्या
जागांवर पोहोचण्यास मदत करत नसेल / जर बस चालक गाडी चालवताना बेजबाबदार असेल तर आपण कुठे तक्रार करावी
?
उत्तर: बस मार्ग क्रमांक, बसची वेळ इ. माहिती रा.प महामंडळाच्या १८००२२१२५० या हेल्पलाईन नंबरवर
कॉल करुन तक्रार करु शकता किंवा जवळच्या आगारात तक्रार पुस्तिकेमध्ये तक्रार करु शकता.
प्रश्न: दाखल केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा कसा करायचा?
उत्तर: एमएसआरटीसीकडे दाखल केलेल्या कोणत्याही तक्रारीची चौकशी किंवा स्थिती जाणुन घेण्यासाठी
१८००२२१२५० हया हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करता येईल. ब.प्रवासी रा.प महामंडळाच्या वेबसाइटला भेट देऊन
त्यांच्या सुचना व तक्रारी ऑनलाईन दाखल करु शकतात.
प्रश्न: प्रवासी त्यांच्या तक्रारी आणि सुचना कुठे करु शकतात?
उत्तर: रा.प महामंडळाद्वारे दर बुधवारी रा.प. आगारात सकाळी १० ते दु.१३.०० या वेळेत प्रवासी राजा
दिन नावाचा साप्ताहिक तक्रार निवारण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. प्रवासी येथे भेट देऊन त्यांच्या
तक्रारी सादर करु शकतात.
प्रश्न: बसने प्रवास करताना बस अनाधिकृत थांब्यावर थांबली तर याकरीता मी कोठे तक्रार करावी?
उत्तर: संबंधित /जवळच्या आगारास तक्रार करण्यात यावी अथवा संबंधित विभागीय कार्यालय, मध्यवर्ती
कार्यालयामध्ये ई-मेल अथवा लेखी तक्रार पाठविता येईल
प्रश्न: प्रवाशी वाहतुकीला महामंडळाकडून कुठली वाहने उपलब्ध ?
उत्तर: एसी शिवनेरी आणि अश्वमेध • एसी शिवशाही • स्लीपर कोच • सीटर- स्लीपर कोच • हिरकणी •
परिवर्तन • माईल्ड स्टील (एमएस) बस • सिटी बस • मिडी
प्रश्न: मी सवलतीचे ई-तिकीट बुक करू शकतो का?
उत्तर: सवलतीचे भाडे तिकीट फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-तिकीट बुकिंगवर उपलब्ध असेल. कंडक्टर
तिकिटात नमूद केलेल्या फोटो ओळखीची पडताळणी करेल. सवलतीच्या भाड्याची तिकिटे MSRTC बस स्थानकांवर किंवा
कोणत्याही अधिकृत बुकिंग एजंटकडून बुक केली जाऊ शकतात.
प्रश्न: ई-तिकीट बुकिंगचे तास काय आहेत?
उत्तर: ई-तिकीट बुकिंग / रद्द करण्याची वेळ 00:30 ते 23:30 IST आहे.
प्रश्न: मी किती दिवस आधी ई-तिकीट आरक्षित करू शकतो?
उत्तर: अपेक्षित प्रवास तारखेपासून एक महिना आधी (प्रवासाची तारीख वगळून) तुम्ही तुमचे ई-तिकीट
इंटरनेटद्वारे आरक्षित करू शकता. आसन आरक्षण बुकिंग सुविधा प्रस्तावित प्रवासाच्या तारखेच्या एक
तासापूर्वी आणि बस सेवेच्या शेड्यूल सुटण्याच्या वेळेच्या आधी किंवा आरक्षण चार्ट छापण्याच्या
वेळेपर्यंत बंद केली जाईल, जे पूर्वीचे असेल.
प्रश्न: मी माझा युजर आयडी आणि पासवर्ड यशस्वीरित्या नोंदणीकृत केला आहे परंतु मला तुमच्या
सिस्टमकडून सक्रिय करण्यासाठी ई-मेल प्राप्त झालेला नाही, मी काय करू शकतो?
उत्तर: कृपया लॉगिन स्क्रीनवर जा आणि "पासवर्ड विसरला" बटण निवडा आणि तुमचा ई-मेल आयडी प्रविष्ट
करा. ई-मेल आयडी यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, सिस्टमला तुमच्या ई-मेल आयडीवर सक्रियकरण मेल पाठविला
जाईल. कृपया तुमचा ई-मेल आयडी उघडा आणि तुमचे खाते सक्रिय करा.