ST Mahamandal Portal

आवडेल तेथे प्रवास योजना - Aavdel Tithe Pravas Yojana

आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना फक्त 1100/- रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतात.या योजनेअंतर्गत 4 दिवसांचा व 7 दिवसांचा पास दिला जातो ह्या पास ची वैधता हि पहिल्या दिवशी रात्रीचे बारा वाजल्यापासून ते शेवट च्या दिवशी (4 आणि 7) दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत असेल.


या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिका फक्त 1100/- रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतात. राज्यातील नागरिकांना कमी खर्चात विविध पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे फिरत यावीत या उद्देशाने या योजनेची सुरुवात सन 1988 पासून सुरु करण्यात आलेली आहे.


योजनेचे नाव आवडेल तेथे प्रवास योजना
राज्य महाराष्ट्र
विभाग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
योजनेची सुरुवात 1988
योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील नागरिक
योजनेचे उद्दिष्ट राज्यातील नागरिकांना कमीत कमी खर्चात प्रवासाचा लाभ देणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यातील नागरिकांना कमी खर्चात त्यांना आवडेल तेथे प्रवास उपलब्ध करून देणे हा आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील नागरिकांना एसटी ने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील नागरिकांना एसटी ने प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे.

आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेची वैशिष्ट्ये

  • सदर योजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाद्वारे सुरु करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदरपर्यंत देता येईल.
  • आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे पास नियमीत बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसमध्ये ग्राह्य राहील.

आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे लाभार्थी

  • राज्यातील सर्व व्यक्ती आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचा फायदा

  • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील प्रवाशांच्या पैशांची बचत होईल.
  • पासधारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जेथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल.
  • या योजनेअंतर्गत तुम्ही एसटी च्या सर्व बसेस (साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी),शिवशाही (आसनी)) ने प्रवास करू शकता.

वाहतूक सेवेचा प्रकार ७ दिवसाच्या पासाचे मूल्य ४ दिवसाच्या पासाचे मूल्य
प्रौढ मुले प्रौढ मुले
साधी (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, व यशवंती (मिडी) आंतरराज्यसह 2382 1194 1364 685
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह 3175 1590 1818 911
१२ मीटर ई-बस (ई-शिवाई) 3619 1812 2072 1038

पासच्या मूल्यात बदल होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे अचूक माहितीसाठी एसटी महामंडळाच्या अधिकृत पोर्टल ला भेट द्या.


आवडेल तेथे प्रवास योजनेच्या अटी व शर्ती

  • ज्या व्यक्तीच्या नावे पास काढण्यात आलेला आहे, केवळ तीच व्यक्ती या पासचा वापर करून प्रवास करू शकते.
  • 'आवडेल तेथे प्रवास' या योजनेअंतर्गत दिलेल्या पासची वैधता समाप्त झाली असेल आणि तो पासधारक प्रवास करताना आढळला, तर त्याच्याकडून तिकीट आकारलं जाईल.
  • या योजनेअंतर्गत पासधारक आवडेल त्या आसनासाठी हक्क सांगू शकत नाही. परंतु या योजनेतील पासधारकांना सदर पासावर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल.
  • पास हरविल्यास त्याच्या ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही किंवा हरविलेल्या पासाचा कोणताही परतावा दिला जाणार नाही.
  • जर एखादा पासधारक दिलेल्या पासचा गैरवापर करत असेल, तर अशा प्रवाशांकडून पास जप्त केला जाईल.
  • प्रवासात वैयक्तीक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्विकारणार नाही. सदरचा पास अहस्तांतरणीय राहील.
  • आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना 00:00 ते 24:00 अशी करण्यात येईल.
  • पासाच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर 24:00 वा. नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील.
  • जर एसटीचा संप किंवा काम बंद आंदोलन यामुळे राज्य परिवहन वाहतूक बंद झाली व प्रवासी सदर पासवर प्रवास करू न शकला, तर प्रवाशाने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा / मुदतवाढ देण्यात येईल.
  • सदरची मुदतवाढ / परतावा वाहतूक सुरु झाल्यापासून 3 महिने पर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल.
  • सदर योजनेत मुलांच्या पासाचे दर 5 वर्षापेक्षा जास्त व 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत.
  • या योजनेअंतर्गत फक्त 7 व 4 दिवसाचे पास दिले जातील.
  • साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहतील.
  • निमआराम बससेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नाहीत. शिवशाही बससेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससेवेसह साधी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी या सर्व सेवांसाठी आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहील.
  • या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास ३० किलो व १२ वर्षाखालील मुलास १५ किलो प्रवासी सामान विनाआकार नेता येईल.
  • सदरचा पास अहस्तांतरणीय राहील. पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल.
  • स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या 'आवडेल तेथे कोठेही प्रवास' पासांसाठी वरील सूचना लागू राहतील.

आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील नजीकच्या राज्य परिवहन बस स्टॅण्डमध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून पैसे भरून पास घ्यावा लागेल.



© 2026 All Rights Reserved